इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक,केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणार! VIDEO

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक,केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणार! VIDEO

मुंबई – देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागली आहे. हाच मुद्दा धरुन काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला असून काँग्रेसचे नेते चरणसिंग सापरा यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसच्यावतीने भाजप सरकार आणि इंधन दरवाढीविरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचं सापरा यांनी म्हटलं आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी यासाठी त्यांना निवेदन दिले जाणार असल्याचं सापरा यांनी म्हटलं आहे.

COMMENTS