“भाजपकडून सत्ता आणि पैशाचा गैरवापर’, काँग्रेसचं मुंबईत आंदोलन! VIDEO

“भाजपकडून सत्ता आणि पैशाचा गैरवापर’, काँग्रेसचं मुंबईत आंदोलन! VIDEO

मुंबई – सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून भाजप विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. राजस्थानमध्ये भाजप लोकशाहीची हत्या करू पहात असून याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई येथील राजभावनासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

COMMENTS