पुण्यातील कालवा फुटला की फोडला – काँग्रेस

पुण्यातील कालवा फुटला की फोडला – काँग्रेस

मुंबई – पुण्यातील जनता वसाहतीत जाणारा मुठा कालवा आज दुपारी फुटल्याची घटना घडली. त्यामुळे दांडेकर पुलावर पाणी आले आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. तसेच या घटनेत परिसरातील घरांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून संतप्त नागरिकांनी महापौरांना घेराव घालत प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या आहेत. या घटनेबाबत काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून काल फुटला की फोडला असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान हे प्रकरण गंभीर असून बेजबाबदारपणाचे आहे. अधिका-यांवर विश्वास ठेवून कामं सुरू आहेत, मंत्री काय करतायत ? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे तसेच लोकांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

तसेच कालवा फुटण्याचे प्रकरण हे संशयास्पद असून कालव्याबाबत आज बैठक होती, ती बैठक रद्द झाली आहे. ही गंभीर बाब असून चौकशी झाली पाहिजे.  तसेच इतकं झाल्यावर पालकमंत्री बैठकीला बसून होते. त्यामुळे भाजप संवेदनशील नसल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

COMMENTS