शिवसेनेला आघाडीत घेण्याबाबत काँग्रेसची सावध भूमिका,शरद पवारांचं ‘ते’ वैयक्तिक मत !

शिवसेनेला आघाडीत घेण्याबाबत काँग्रेसची सावध भूमिका,शरद पवारांचं ‘ते’ वैयक्तिक मत !

मुंबई  तिस-या आघाडीत शिवसेनेला सोबत घेण्याबाबत शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेसोबतच्या आघाडीसाठी काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव नाही. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद आहेत.शिवसेनेचा अजेंडा वेगळा आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणलं पाहिजे. त्यामुळे त्याबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा होणार असल्याचं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असं वक्तव्य शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. शरद पवार यांचं ते मत वैयक्तिक असून याबाबत सर्व प्रमुख एकत्र बसतील तेव्हा चर्चा होईल”, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेला आघाडीसोबत घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान आघाडीसोबत जाण्याबाबत शिवसेनेतल्या एका गटात कुजबुज सुरु आहे, तर हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपची साथ न सोडण्यावर दुसरा गट ठाम आहे. याशिवाय स्वबळावर लढून शिवसेनेची ताकद आजमवण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर काही नेत्यांचा दबाव असल्याची माहिती आहे. त्यामुळे आघाडीत जाण्याबाबत शिवसेनेतही तीन मतप्रवाह तयार झाले असल्याचं दिसत आहे.

COMMENTS