औरंगाबाद नामांतरावरुन काॅंग्रेस-शिवसेनामध्ये ठिणगी

औरंगाबाद नामांतरावरुन काॅंग्रेस-शिवसेनामध्ये ठिणगी

औरंगाबाद : शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिवनगर करावे, या मागणीसाठी प्रयत्नशील आहे. त्यात राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना सत्ते आल्यानंतर तर ही मागणी जोर धरू लागली आहे आहे. गेल्या काही महिन्यापासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आणला जात होता. शहरातील चौकात ‘लव्ह औरंगाबाद’, ‘सुपर संभाजीनगर’ असे फलक लावण्यात आले होते. त्यावरुन सुरू असणाऱ्या वादाच्या चर्चेला नामांतराचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती सांगण्यात आले. यावर आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामातंरास काॅंग्रेसचा विरोध असेल. अशी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आगामी काळा काॅंग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमधील संघर्षांची ठिगणी पडण्याची शक्यता आहे.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकांची तयारीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी थोरात औरंगाबाद येथे आले होते. औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आला तर त्याला कॉंग्रेसचा विरोध असेल. किमान समान कार्यक्रमामध्ये नामांतरासारख्या बाबीचा समावेश नाही. अशा नामांतरामुळे सामान्यांचा विकास होतो असे मानत नाही. केवळ नामांतरच नाही तर घटनेतील प्रास्ताविकेमध्ये दिलेल्या मूल्यांची प्रतारणा होईल अशा कोणत्याही कृतीस कॉंग्रेसचा विरोध असेल असे थोरात यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे असा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी नव्याने पाठविला असल्याचे वृत्त वाहिन्यावरुन अलिकडेच प्रसारीत झाले होते. वास्तविक अशा प्रकारचा प्रस्ताव गेल्या वर्षी म्हणजे ४ जानेवारी रोजी पाठविण्यात आला होता. त्या वेळीही रेल्वे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करुनही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नव्हते. मात्र नामांतराचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात येत होतेकॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आलेल्या नामांतराच्या मुद्द्यावर शिवसेनेशी थेट मतभेद असल्याचे स्पष्ट झाले.

COMMENTS