मंत्रिपदासाठी काँग्रेस नेते दिल्लीत,  ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्रीपद ?

मंत्रिपदासाठी काँग्रेस नेते दिल्लीत, ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्रीपद ?

नवी दिल्ली – महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले असून ते आज पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे या विस्तारात कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान काँग्रेसकडून बाळासाहेब थोरातांसह नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता मंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, अमित देशमुख या आमदारांची नावं चर्चेत आहेत. काँग्रेसकडे महसूल, ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय (पदुम), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला आणि बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत आणि पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण ही खाती देण्यात आली आहेत. त्यामुळे आता यापैकी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याकडे कोणतं खातं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS