काँग्रेसच्या अध्यक्षपदावर पुन्हा ‘या’ ज्येष्ठ नेत्याची निवड!

काँग्रेसच्या अध्यक्षपदावर पुन्हा ‘या’ ज्येष्ठ नेत्याची निवड!

नवी दिल्ली – राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुकूल वासनिक आणि कर्नाटकचे मल्लिकार्जुन खरगे यांची नावं संध्याकाळपर्यंत चर्चेत होती. परंतु अचानक सोनिया गांधी यांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला कायमस्वरुपी अध्यक्ष कधी मिळणार अशी चर्चाही सुरु झाली आहे.

दरम्यान आज दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राहुल गांधी यांनी 3 जुलै 2019 रोजी राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामाही या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

COMMENTS