काँग्रेसची रणनिती बदलली, राहुल गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय !

काँग्रेसची रणनिती बदलली, राहुल गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या रणनितीत बदल करण्याचा निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला आहे. राहुल गांधींनी कट्टरपंथी ऐवजी उदारवादी आणि विद्वान समजल्या जाणाऱ्या मुस्लीम चेहऱ्यांची निवड केली असून उदारवादी मुस्लीम विचारवंतांची ते भेट घेणार आहेत. राहुल गांधी यांनी यापूर्वी दलित आणि मागासवर्गीयांच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. त्यानंतर ते मुस्लीम उदारवादी नेत्यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदू-मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण रोखाण्यासाठी राहुल गांधी यांनी हे पाऊल उचललं आहे.  त्यासाठी राहुल गांधींनी कट्टरपंथी ऐवजी उदारवादी आणि विद्वान समजल्या जाणाऱ्या मुस्लीम चेहऱ्यांची निवड केली आहे. यामध्ये शबनम हाश्मी, झोया हसन, जामिया मिलिया इस्लामियाच्या माजी कुलगुरू सईदा हामिदा आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष झेड.के. फैजान यांची ते भेट घेणार आहेत.

तसेच या बैठकीचा अजेंडा ठरला नसल्याचे फैजान यांनी सांगितले. आम्हाला फक्त आमंत्रित करण्यात आले आहे. तिथे काय आणि कोणत्या मुद्यावर चर्चा होणार याबाबतची माहिती समजू शकली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS