पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश!

पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश!

सातारा – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कराड दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का बसला आहे. चव्हाण यांच्या विरोधातील भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी त्यांना जोरदार धक्का दिला आहे. भोसले यांनी निवडणूक प्रचाराला आजपासून सुरुवात केली असून प्रचाराच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, सरपंच सोसायटी चेअरमन अशा 100 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पंजाबराव पाटील यांनी देखील भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भोसले यांची ताकद वाढली आहे.

दरम्यान यापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांचे निष्ठावंत आमदार आनंदराव पाटील यांनी कराडच्या 14 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता कराड दक्षिणमधील 100 हून अधिक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी सरपंच, सोसायटी चेअरमन, सभापती, जिल्हापरिषद सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले उपस्थित होते.

COMMENTS