भाजपला कचाट्यात टाकणारे काँग्रेसचे राज्यपालांना प्रश्न !

भाजपला कचाट्यात टाकणारे काँग्रेसचे राज्यपालांना प्रश्न !

नवी दिल्ली – राजभवनात आज सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर काँग्रेसकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली जात आहे. काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित करत, राज्यपालांकडे त्याची उत्तरं मागितली आहेत.

काँग्रेस नेते रणदीपसिंह सूरजेवाला यांनी कालच्या सर्व घटनाक्रमाची माहिती मागितली आहे.याबाबत त्यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न…

राज्यपालांनी केंद्र सरकारला राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस किती वाजता केली?

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल रात्री किती वाजता झाली? त्यामध्ये कोण कोण मंत्री होते? केंद्राने किती वाजता राष्ट्रपतींना राजवट हटवण्याची शिफारस केली?

केंद्राची शिफारस राष्ट्रपतींना किती वाजता पाठवण्यात आली?

राष्ट्रपतींनी केंद्राची शिफारस किती वाजता स्वीकारली?

राज्यपालांनी कोणत्या पत्राद्वारे फडणवीस आणि अजित पवारांना शपथविधीसाठी निमंत्रण दिलं?

भाजपने सरकार बनवण्याचा दावा कधी केला?

भाजप-राष्ट्रवादीला किती आमदारांचं सह्यांचं पत्र मिळालं?

राज्यपालांनी सर्व आमदारांच्या सह्यांची पडताळणी एका तासात कशी केली?

राज्यपालांनी आतापर्यंत का सांगितलं नाही की बहुमत कधी सिद्ध करायचं आहे?

मुख्य न्यायाधीशांना शपथविधीला का बोलावलं नाही?

शपथ किती वाजता झाली?, कोणत्याच मीडियाला का माहिती दिली नाही?

COMMENTS