राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेस सोडणार ?, मोठ्या वक्तव्यामुळे खळबळ !

राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेस सोडणार ?, मोठ्या वक्तव्यामुळे खळबळ !

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण येत्या 15 दिवसांत मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचे वक्तव्य राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. क्यामुळे ते काँग्रेस पक्ष सोडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान माझी भूमिका स्पष्ट असून मी गोंधळलेलो नाही. उलट माझ्यामुळे अनेकजण गोंधळलेले आहेत,य तसेच सुजयचा निर्णय त्यानेच घेतला. त्याला थांबायला सांगितले होते. मात्र त्याने निर्णय घेऊन टाकला, असं ते यावेळी म्हणाले. त्यामुळे विखे पाटील 15 दिवसांनी काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS