राहुल गांधींचा आणखी एक निर्णय, पक्षाची ‘ही’ जबाबदारी टाळली!

राहुल गांधींचा आणखी एक निर्णय, पक्षाची ‘ही’ जबाबदारी टाळली!

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी लोकसभेत काँग्रेसच्या गटनेतेपदाची जबाबदारी घेणेही टाळलं आहे.राहुल गांधींनी गटनेतेपदाची जबाबदारी आपल्याकडे नको असल्याचं म्हटलं आहे. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर किमान सभागृहात तरी पक्षाचं नेतृत्व करावं, अशी पक्षातल्या नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र त्यांनी आपला नकार कायम ठेवला आहे.

दरम्यान राहुल गांधी यांनी गटनेतेपदाची जबाबदारी आपल्याकडे नको असल्याचं म्हटल्यानंतर पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची लोकसभेत काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती केली आहे.त्यामुळे अधीर रंजन चौधरी यांची ही लोकसभेतील पाचवी टर्म आहे. परंतु राहुल गांधी यांनी गटनेतेपद नाकारल्यामुळे ते अजून लोकसभा निवडणुकीतील पराभव विसरले नसल्याची चर्चाराजकीय वर्तुळात सुरु आहे.

COMMENTS