काँग्रेसच्या आजच्या जनआक्रोश सभेचं काय होणार ?  दोन नेत्यांनी दोन ठिकाणी आयोजित केली सभा !

काँग्रेसच्या आजच्या जनआक्रोश सभेचं काय होणार ?  दोन नेत्यांनी दोन ठिकाणी आयोजित केली सभा !

चंद्रपूर – राज्य सरकराला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या तीन वर्षातील सरकारच्या अपयशाचा पाढा वाचवण्यासाठी काँग्रेसने राज्यभर जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन केलं आहे. आज हे आंदोलन चंद्रपूरमध्ये आयोजित करण्यात आलंय. आजचं हे आंदोलन वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आलंय. काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी हे आंदोलन दोन ठिकाणी आयोजित केलं आहे.

माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी एका ठिकाणी जनआक्रोश आंदोलन आयोजित केलं आहे. आपल्या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण येणार आहेत. त्यामुळं आपलं हेच अधिकृत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तर आपण काँग्रेसचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचा दावा नरेश पुगलिया यांनी केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचं हे जनआक्रोश आंदोलन नेमंक  कुठं होतं. काँग्रेसचे नेते कुठल्या कार्यक्रमाला हजेरी लावतात याकडं लक्ष लागलं आहे.

सरकारविरोधात आंदोलनाची राळ उठवून त्यांना कोंडीत पकडण्याची संधी असताना आता काँग्रेसच्या नेत्यांना चंद्रपूरच्या या पक्षातल्या दोन दिग्गज नेत्यांना समजवता समजवता नाकेनऊ आली आहे.

COMMENTS