राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडलेल्या रावेरमध्ये काँग्रेसकडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर !

राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडलेल्या रावेरमध्ये काँग्रेसकडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर !

मुंबई – जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघातील जागेबाबत आघाडीमध्ये सुरु असलेला तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडलेल्या रावेरमध्ये काँग्रेसने माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेत या ठिकाणी भाजपाकडून विद्यमान खासदार तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी उल्हास पाटील विरुद्ध रक्षा खडसे असा सामना रंगणार आहे.

दरम्यान आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली होती. परंतु तगडा उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर काँग्रेसनं याठिकाणी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

COMMENTS