संगमनेर नगरपालिकेत भाजपला धक्का, काँग्रेसनं मारली बाजी!

संगमनेर नगरपालिकेत भाजपला धक्का, काँग्रेसनं मारली बाजी!

अहमदनगर, शिर्डी – संगमनेर नगरपालिकेत भाजपला धक्का बसला असून प्रभाग क्र.10 (अ) मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार राजेंद्र वाकचौरे यांचा 711 मतांनी दणदणीत विजय झाला आहे. तर सोनई पंचायत समिती पोटनिवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार काका डफाळ यांचा 8264 मतांनी विजय झाला आहे.

तर पुण्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील वाडेबोल्हाई पंचायत समिती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी क‌ाँग्रेसच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला असुन सर्वपक्षीय आघाडीचे शामराव गावडे यांचा 1206 मतांनी झाला दणदणीत विजय झाला अहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना जोरदार झटका बसला आहे.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाच्या गटातच त्यांच्या पंचायत समिती उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे हा मोठा धक्का असल्याचं दिसत आहे.

COMMENTS