“या” सहा जणांची समिती ठरवणार काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार !

“या” सहा जणांची समिती ठरवणार काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार !

नवी दिल्ली –  काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्क्रिनिंग समितीची घोषणा केली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्याचं काम ही समिती करणार आहे.  या समितीचे प्रमुख म्हणून काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांच्या या समितीमध्ये आणखी 5 सदस्य असणार आहेत.

पाच सदस्यांमध्ये हरीश चौधरी, मणिकम टागोर, महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लीकार्जुन खरगे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विधीमंडळातील काँग्रेसचे गटनेते के सी पाडवी यांचा समावेश आहे. विविध जिल्ह्यातून येणा-या उमेदवारांच्या शिफारशींवर ही समिती निर्णय घेऊन उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणार आहे. स्क्रिनिंग समितीची घोषणा करुन काँग्रेसनं आता निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

COMMENTS