काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, विलासरावांच्या धाकट्या चिरंजीवांसह 52 उमेदवारांचा समावेश !

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, विलासरावांच्या धाकट्या चिरंजीवांसह 52 उमेदवारांचा समावेश !

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्या यादीनंतर आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या दुसऱ्या उमेदवार यादीत 52 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून तर अमित देशमुख यांना लातूर शहरमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर आता दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे दुसरे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

तसेच कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

 

COMMENTS