सत्तासंघर्षाला पुन्हा एकदा कलाटणी, सत्तास्थापन करण्यात शिवसेना अपयशी !

सत्तासंघर्षाला पुन्हा एकदा कलाटणी, सत्तास्थापन करण्यात शिवसेना अपयशी !

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्ष कायम असून काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिला नसल्याची माहिती समोर येत आहे. कारण काँग्रेसच्या पाठिंब्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेकडे काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्रक आलेलंच नाही. काँग्रेसकडून जे पत्रक आलंय त्यामध्ये पाठिंब्याचा उल्लेखच नाही. त्यामुळे शिवसेनेची मोठी अडचण झाली आहे. शिवसेनेला राज्यपालांनी दिलेली मुदत आता संपली असून शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. परंतु वेळ वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिला असल्याची माहिती आहे.

दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याची बातमी काही वेळापूर्वी समोर आली होती. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा ऐतिहासिक आघाडीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु काँग्रेसने आपला पाठिंबा जाहीर केला नसल्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत भर पडली आहे.

COMMENTS