भारत बंद आंदोलनात ‘राहुल गांधी मुर्दाबाद’च्या घोषणा ! VIDEO

भारत बंद आंदोलनात ‘राहुल गांधी मुर्दाबाद’च्या घोषणा ! VIDEO

नवी दिल्ली – केंद्र सरकारविरोधात आज देशभरात विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून विरोधी पक्षातील जवळपास 21 पक्षांनी या बंदमध्ये सहभाग घेतला होता. या बंददरम्यान भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परंतु भाजपनं एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडओमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधातच घोषणाबाजी केली असल्याचा दावा भाजपनं केला आहे.

दरम्यान या व्हिडीओमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’ आणि ‘राहुल गांधी मुर्दाबा’च्या घोषणा दिल्या असल्याचा दावा भाजपने केला आहे. दोन वेगवेगळे व्हिडीओ एकत्र करून भाजपने काँग्रेच्या आजच्या आंदोलनात मोदींचा जयघोष झाल्याचे ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये भाजपने, काँग्रेसच्या भारत बंद आंदोलनात, राहुल गांधी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा असे ट्विट भाजपने केले आहे.

 

COMMENTS