सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदेंना उमेदवारी !

सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदेंना उमेदवारी !

मुंबई – सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसनं पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती आहे. मागच्या निवडणुकीत याच मतदारसंघातून शिंदे यांना पराभवाचा फटका बसला होता.भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी त्यांचा पराभव केला होता. मोदी लाट असल्यामुळे मोठ्या मताधिक्यांनी त्यांचा विजय झाला होता. यावेळी आपणच निवडून येणार असल्याचा विश्वास सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी 77 वर्षीय शिंदे यांना पुन्हा तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे.

दरम्यान सुशीलकुमार यांची कन्या आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे सोलापुरातून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. परंतु मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS