सत्ता स्थापनेसाठी विरोधकांचा मास्टरप्लॅन, सोनिया गांधींचा पुढाकार !

सत्ता स्थापनेसाठी विरोधकांचा मास्टरप्लॅन, सोनिया गांधींचा पुढाकार !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली वाढल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी विरोधी पक्षांकडून देखील मास्टरप्लॅन आखण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी स्वतः सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे.  सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे.याबाबत सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. तसेच जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे.

त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या  असल्याचं दिसत आहे. सोनिया गांधी यांनी 23 मे रोजी ही बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे यावरुन दिसत आहे.

या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीसाठी वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी, डीएमके प्रमुख एम.के.स्टॅलिन हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS