काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर !

काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसनं आपल्या स्टार प्रचारक मेत्यांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकांसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने प्रसिद्ध केली आहे. या यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, नगमा, कुमार केतकर, मोहम्मद अझहरुद्दीन, इम्रान प्रतापगडी यांच्यासह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान गेली कैही दिवसांपासून पक्षापासून दूरावलेले नेते  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचेही नाव स्टार प्रचारकांमध्ये आहे. त्याचबरोबर अभिनेत्री नगमा, माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरुद्दीन, प्रसिद्ध शायर इम्रान प्रतापगडी यांचीही नावं आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध समूहांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी तयार केली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS