काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीचा मुर्हूत ठऱला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीचा मुर्हूत ठऱला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीवरुन पक्षात बराच चर्चा सुरू आहे. बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष निवड होणार असून त्यासाठी अनेक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मकरसंक्रांतीनंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्रातील नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विधासभेचे गटनेते आणि महसूलमंत्री अशी तीन पदांची जबाबदारी आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष निवड झाल्यापासून प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा होऊ लागली. त्यात थोरांनी मागील आठवड्यात दोन दिवस दिल्लीत मुक्काम करून पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. तेव्हापासून प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव यांची नावे चर्चेत आहेत.

त्यामुळे आता नवीन प्रदेशाध्यक्षपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नाराजी थांबवण्यासाठी इतर नेत्यांची समजूत काढण्यासाठी जबाबदारी वाटून देण्याचा पक्षश्रेष्ठी विचार करीत आहे. मकरसंक्रांतीनंतर नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

COMMENTS