शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने काँग्रेसने शिवसेनेपुढे ठेवल्या ‘या’ प्रमुख अटी?

शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने काँग्रेसने शिवसेनेपुढे ठेवल्या ‘या’ प्रमुख अटी?

नवी दिल्ली – शिवसेना सत्तास्थापन करण्यास अपयशी ठरल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण देऊन आज 8.30 पर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत आता हालचालींना वेग आला आहे.राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्तास्थापन करण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेसचे दिल्लीचे बडे नेते मुंबईत येणार आहेत. काँग्रेसचे खासदार अहमद पटेल, के सी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हे मुंबईत येऊन शरद पवारांच्या भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचं अद्याप ठरलेलं नाही. या भेटीपूर्वी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने काही अटी ठेवल्या असल्याची माहिती आहे. काँग्रेसने 11 मंत्रिपदं, विधानसभा अध्यक्षपद, किमान समान कार्यक्रम अशा प्रमुख अटी ठेवल्या असल्याची माहिती आहो.

काँग्रेसने शिवसेनेपुढे ठेवल्या या अटी

सत्तावाटपाचं सूत्र – 4 आमदारांमागे 1 मंत्रिपद म्हणजे 44 आमदारांनुसार 11 मंत्रिपदे

काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचं बाहेरुन पाठिंबा देण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्याचं मत

किमान समान कार्यक्रम

समन्वय समिती

महापालिका निवडणुकांसाठी फॉर्म्युला तयार करणे

महामंडळांमध्येही काँग्रेसला वाटा हवा

मल्लिकार्जुन खर्गे यांचा सेनेसोबतच्या युतीला विरोध, मात्र अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि शेवटी सुशीलकुमार शिंदे यांनी मनवल्यानंतर सोनिया गांधी युतीसाठी तयार

ठाकरे कुटुंबातील शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला काँग्रेसचा विरोध. जर मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबातील असेल तर रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे असेल अशी काँग्रेसची धारणा

काँग्रेसला वाटतं, शिवसेना ड्रायव्हिंग सीटवर, राष्ट्रवादीकडे चावी आणि काँग्रेसकडे स्वतंत्र ब्रेक सिस्टिम असावी.

COMMENTS