सांगलीतील ‘हे’ दोन दिग्गज नेते भाजपच्या संपर्कात, काँग्रेसला मोठं खिंडार पडणार?

सांगलीतील ‘हे’ दोन दिग्गज नेते भाजपच्या संपर्कात, काँग्रेसला मोठं खिंडार पडणार?

सांगली – सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील दोन नेते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. हे दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर असल्याने, काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवल जात आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही नेत्यांची पक्ष प्रवेशाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झालू असून या आठ दिवसात, निर्णय होण्याची शक्यता सूत्रांची वर्तवली आहे.

दरम्यान विश्वजित हे काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे पुत्र तर सत्यजित हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ, सक्षम नेतृत्व, जनाधार असलेले नेते असून ही काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे या दोन्ही नेत्यांच्या कार्यकिर्दीला फटका बसत असल्याने, हे दोन्ही नेते, काँग्रेस सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसमधील गटातटामुळे जिल्ह्यातील, सत्ताकेंद्र हातातून जात असल्याने, जनतेचे प्रश्न सोडवताना ही अडचणी येत असल्याचं म्हणण या नेत्यांचं आहे.

दरम्यान आमदार विश्वजित कदम यांनी भाजपात येण्याबाबत यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विश्वजित यांना खुली ऑफर दिली होती. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे.

COMMENTS