काँग्रेसला धक्का, माजी आमदार वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर ?

काँग्रेसला धक्का, माजी आमदार वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर ?

अमरावती – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. काँग्रोस-राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशातच काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत हे बहुजन वंचित आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मंगळवारी रावसाहेब शेखावत यांनी मुंबईत बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. या वृत्ताला खुद्द रावसाहेब शेखावत यांनी दुजोरा दिला आहे. रावसाहेब शेखावत वंचित आघाडीच्या तिकिटावर अमरावतीमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान रावसाहेब शेखावत यांनी 2009 मध्ये काँग्रेसकडून अमरवाती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 2009 ते 2014 या दरम्यान ते या ठिकाणी आमदार होते. 2009 च्या निवडणुकीत त्यांनी सुनील देशमुख यांचा पराभव केला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा रावसाहेब आणि भाजप उमेदवार सुनील देशमुख यांच्यात लढत झाली. मात्र त्यावेळी रावसाहेब यांचा पराभव झाला होता. अमरावतीतून सध्या भाजपचे सुनील देशमुख आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात रावसाहेब शेखावत यांना वंचितकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हं आहेत.

COMMENTS