पंतप्रधानपदाबाबत काँग्रेसची भूमिका, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची माहिती !

पंतप्रधानपदाबाबत काँग्रेसची भूमिका, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची माहिती !

नवी दिल्ली – आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु याबाबत काँग्रेसनं आता स्पष्टीकरण दिलं असून २०१९च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करणार नसल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिलं आहे.

दरम्यान फक्त राहुल गांधीच नाही तर इतर कोणाच्याही नावाचा दावा काँग्रेस पंतप्रधानपदासाठी करणार नसल्याचं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांना आम्ही कधीही पंतप्रधान बनवणार असल्याचं म्हटले नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ज्यावेळी काही काँग्रेस नेत्यांनी अशा प्रकारची मत व्यक्त केली होती, त्यानंतर ऑल इंडिया काँग्रेसने याची दखल घेत अशी विधाने न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आम्हाला भाजपाला सत्तेतून दूर करायचे आहे. आम्हाला एक पर्यायी सरकार बनवायचे असून हे सरकार पुरोगामी असावे, त्यात व्यक्तिगत स्वातंत्र्याचा सन्मान होईल, टॅक्स टेररिझमला प्रोत्साहन दिले जाणार नाही, महिला आणि मुलांना संरक्षण दिले जाईल तर शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध राहिल असंही यावेळी पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS