संघाच्या बालेकिल्ल्यावर काॅग्रेसचा झेंडा, नागपूरमध्ये अभिजीत वंजारी विजयी

संघाच्या बालेकिल्ल्यावर काॅग्रेसचा झेंडा, नागपूरमध्ये अभिजीत वंजारी विजयी

नागपूर – विधानपरीषदेच्या निवडणुकीत मराठवाडा, पुणे पदवीधर मतदारसंघात विजय मिळवल्याने महाविकास आघाडीने भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओखळल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी झेंडा फडवला आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असलेल्या संदीप जोशी यांचा पराभवाला सामोरे जावे लागले.

नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अभिजीत वंजारी आघाडी होते. पाचव्या फेरीअखेर १ लक्ष ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. पंरतु पहिल्या पसंतीक्रमांच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७ चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. अभिजित वंजारी एकूण मतं ५५ हजार ९४७, संदीप जोशी एकूण मतं ४१ हजार ५४० मते मिळाली. विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक २ सुरु करण्यात आला.

COMMENTS