पंजाबमध्ये भाजप-अकाली दल युतीला पुन्हा दणका, सर्व 22 जिल्हा परिषदा काँग्रेसने जिंकल्या !

पंजाबमध्ये भाजप-अकाली दल युतीला पुन्हा दणका, सर्व 22 जिल्हा परिषदा काँग्रेसने जिंकल्या !

चंदीगढ – पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या भाजप आणि अकाली दल युतीला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकतही जोरदार धक्का बसला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अकाली आणि भाजपची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. निवडणूक झालेल्या सर्व 22 जिल्हा परिषदा काँग्रेसने जिंकल्या आहेत. सात जिल्हा परिषदांमध्ये तर अकाली-भाजप युतीला एकही जागा मिळाली आहे. पंचायत समिती निवडणुकीमध्येही अकाली-भाजप युतीचा मानहाणीकारक पराभव झाला आहे.

काल सकाळी मतमोजणी सुरू झाली असून रात्री उशीरपर्यंत सुरू होती. त्यामुळे अंतिम आकडेवारी अजून हाती आलेली नाही. मात्र पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसनं पूर्ण वर्चस्व स्थापन केले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं होतं. त्यानंतर आता या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही काँग्रेसनं विजयाची पुनरावृत्ती केली आहे. 22 जिल्हा परिषदा आणि 150 पंचायत समितीसाठी ही निवडणूक झाली आहे.

चार्ट सौजन्य – दैनिक भास्कर (निवडणुकीची पूर्ण आकडेवारी हाती आलेली नाही.)

COMMENTS