काँग्रेसच्या महिल्या प्रवक्त्यांना वरिष्ठ नेत्यानं स्टेजवरुन हाकललं, राहुल गांधींकडे केली तक्रार !

काँग्रेसच्या महिल्या प्रवक्त्यांना वरिष्ठ नेत्यानं स्टेजवरुन हाकललं, राहुल गांधींकडे केली तक्रार !

नवी दिल्ली – काँग्रेसच्या महिल्या प्रवक्त्यांना काँग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यानं स्टेजवरुन हाकललं असल्याची घटना घडली आहे. याबाबत या महिला प्रवक्त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींकडे तक्रार केली आहे. मध्य प्रदेशातील निवडणूक समितेच अध्यक्ष ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या नेत्या नुरी खान यांना एका कार्यक्रमातून स्टेजवरून खाली उतरवल्याची माहिती आहे. घटनेनंतर नुरी यांनी सिंधिया यांच्या या वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पत्र लिहिले आहे.

दरम्यान नुरी यांनी एका फेसबूक व्हिडिओमध्ये या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. या वर्तणुकीमुळे संपूर्ण अल्पसंख्याक समुदायाला दुःख झालं असून पक्षाला सत्तेत यायचे असेल तर सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावा लागेल, मी जर चुकीच्या ठिकाणी बसली असेल तरी सांगण्याची एक पद्धत असते. पक्षाने बाहेर बसायला सांगितले असते तरी मी बसले असते. परंतु सर्वांसमोर असा अपमान करणे योग्य नसल्याचं नुरी यांनी म्हटलं आहे.  महिला कार्यकर्ता म्हणून मला सन्मान मिळायला हवा होता. मी लहान-लहान मुले घरी सोडून राजकारणात काम करते त्याचाही वरिष्ठ नेत्यांनी मान ठेवायला पाहिजे असंही नुरी यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

 

 

COMMENTS