काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी ! VIDEO

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी ! VIDEO

नवी दिल्ली  – राजस्थानमध्ये एका बैठकीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली आङे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आली असली तरी जालोर येथील जागेवर काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. या पराभवाचा लोकसभा निवडणुकीत धडा घेण्यासाठी प्रदेश प्रचारक विवेक बंसल यांच्या उपस्थित एक जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

ही बैठक सुरू असताना काँग्रेसमध्ये सरळसरळ दोन गट पडले. या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यामुळे याठिकाणी राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं.

COMMENTS