काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक कार्याध्यक्ष भाजपच्या वाटेवर?

काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक कार्याध्यक्ष भाजपच्या वाटेवर?

मुंबई – काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक कार्याध्यक्ष भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण भाजपचे ज्यष्ठ नेते आणि नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपात आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आज चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान मी याला पद नाही, जबाबदारी म्हणतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीचे राज्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला 51 टक्क्यांहून जास्त मतदान मिळालं. 227 च्या जागांमध्ये आम्ही पुढे आहोत. त्यात वाढ होईल पण कमी होणार नाही. तसेच येत्या निवडणुकीत विजयासाठी सहयोगी पक्षाला जिंकवणं तितकंच महत्वाचं आहे. निवडणूक होऊन निकाल लागणं ही फक्त औपचारिकता आहे. निकाल आजच लागला असल्याचही यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS