काँग्रेस आमदाराच्या होर्डिंग्जवर मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांचे फोटो !

काँग्रेस आमदाराच्या होर्डिंग्जवर मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांचे फोटो !

मुंबई – मुंबईतील वडाळा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी गणेश भक्तांच्या स्वागताचे होर्डिंग्ज त्यांच्या मतदारसंघात लावली आहेत. या होर्डिंग्जवरुन काँग्रेसचे नेते गायब झाले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणि मुबंईतील विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचे फोटो लागले आहेत. या लक्षवेधी होर्डिंग्जमुळे मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगळ्या राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे. कोळंबकर लवकरच भाजपवासी होणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

खरंतर कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. मात्र राणेंचा फोटोही त्यांच्या होर्डिंग्जवर नाही. कोळंबकर हे पूर्वीचे शिवसैनिक. शिवसनेच्या तिकीटावर ते आमदार झाले. मात्र नारायण राणे यांची शिवसेना सोडली तेंव्हा कोळंबकर हे त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले. तेंव्हापासून ते वडाळा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडूण येत आहेत. मात्र  गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेस सोडणार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामध्ये या पोस्टरमुळे भर पडली आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. त्यामुळे कोळंबकर हे त्या पक्षात जातील अशीही शक्यता वर्तविली जात आहे. राणेंनी पक्ष स्थापन केल्यानंतर नितेश राणे यांनी कोळंबकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी आपण राणेंसोबत असल्याचं कोळंबकर म्हणाले होते. मात्र आजच्या या होर्डंग्जवरुन त्यांनी वेगळाच संदेश दिला आहे.

कोळंबकर यांचा त्यांच्या मतदरसंघात चांगला संपर्क आहे. मात्र गेल्यावेळी ते मोदी लाटेत अगदी थोड्या मतांनी विजयी झाले होते. तर भाजपच्या उमेदवाने त्यांना जोरदार टक्कर दिली होती. त्या पराभूत उमेदवाराने पुन्हा या मतदारसंघातून 2019 ची तयारी सुरू केली होती. मात्र आता कोळंबकर यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला. तर तिकीटीवरुन भाजपमध्ये नाराजी होण्याची शक्यता आहे. नेमकं काय होतं ते पाहण्यासाठी आपल्याला काही दिवस थांबावे लागेल.

COMMENTS