राज्यात लवकरच लसीकरण मोहिम सुरू – राजेश टोपे

राज्यात लवकरच लसीकरण मोहिम सुरू – राजेश टोपे

मुंबई : ब्रिटन येथील नव्या करोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असून लवकरच राज्यात
लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षिता वाढणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते आज माध्यमांशी बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन करोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही यंत्रणांना दिले. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांवर आली असून रिकव्हरी दर सुध्दा अतिशय चांगला आहे. करोना लसीकरणाचा ड्राय रन नुकताच झाला. आता केंद्र शासनाकडून लस मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होईल.

ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात आले आहे. या नव्या कोरोनाच्या स्टेनमुळे घाबरण्याची गरज नाही. पण दक्षता घेणे महत्वाचे आहे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटाईजरचा वापर या नियमांचे पालन केल्यास संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे.

COMMENTS