राज्यातील महामंडळावरील नियुक्त्या जाहीर, शिवसेनेला 9 महामंडळे, वाचा कोणाला कोणते महामंडळ मिळाले !

राज्यातील महामंडळावरील नियुक्त्या जाहीर, शिवसेनेला 9 महामंडळे, वाचा कोणाला कोणते महामंडळ मिळाले !

 मुंबई – गेली चार वर्ष होणार होणार असं सुरू असलेल्या महामंडळावरील नियुक्त्या आज करण्यात आल्या आहेत. 20 पैकी 9 महामंडळे शिवसेनेकडे देण्यात आली आहेत. मात्र मुंबई आणि नवी मुंबईत अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणा-या सिडको आणि म्हाडाच्या अध्यक्षपदाची माळ भाजपच्याच नेत्यांच्या गळ्यात पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. भाजपाचे प्रवक्ते मधु चव्हाण यांच्याकडे म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपपवण्यात आली आहे. तर पनवलेचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सिडकोची जबाबदारी देण्यात आली आहे.
                                          शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या सभापतीपदी नियुक्ती  करण्यात आली आहे. शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार आमदार उदय सामंत यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांच्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे. राज्य सरकारचं कालावधी जेमतेम एक वर्ष राहिले असताना महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

COMMENTS