मुंबई – शिवसेना नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द !

मुंबई – शिवसेना नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द !

मुंबई – महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील नगरसेवक सगूण नाईक यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं असून त्यांचं जातप्रमाणपत्र पडताळणीत अवैध ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांचं सदस्यत्त्व रद्द करण्याचा निर्णय कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. याबाबतची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.

दरम्यान याच प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार रफिक शेख यांनी सगुण नाईक यांच्या जातप्रमाणपत्राबाबत आक्षेप नोंदवला होता. याबाबत त्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर नाईक यांना जात प्रमाणपत्र वैधतेबाबतचे पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्यामुळे नाईक यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे सगुण नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

COMMENTS