आज अशक्य, उद्या होणार मतमोजणी, उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघ !

आज अशक्य, उद्या होणार मतमोजणी, उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघ !

उस्मानाबाद – उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मतमोजणी उद्या होणार आहे. या मतदारसंघातील मतमोडणी तातडीनं घेण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपिठानं दिल्याने मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आजच मतमोजणीची यंत्रणेची जुळवाजवळ, दोन्ही उमेदवारांचे प्रतिनिधी यांना एकत्र करुन घेणे शक्य नसल्याने मतमोजणी उद्या होणार अशी माहिती मिळत आहेत.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. बीड नगरपालिकेतील काकू नाना विकास आघाडीच्या अपात्र नगरसेवकांची मते स्वतंत्रपणे मोजण्याला काकू नाना विकास आघाडीनं हरकत घेतली होती. ती मान्य करत सर्व मते एकत्रित मोजण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात थेट लढत आहे.

COMMENTS