ते दिवस आठवल्यावरही अंगावर शहारे : उद्धव ठाकरे

ते दिवस आठवल्यावरही अंगावर शहारे : उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबई – कोरोना लसीकरण हे क्रांतिकारी पाऊल आहे. सर्व कोरोना योद्ध्यांना मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी रुग्णांची संख्या प्रचंड होती. आपल्या कोविड योद्ध्यांनी चांगलं काम केलं. ते दिवस आठवल्यावरही अंगावर शहारे येतात, काहीच हाती नसताना आपण लढत होतो. तुम्ही सर्व होतात, म्हणून शक्य झालं. तुमच्यामुळे कोव्हिड सेंटर ओस पडले आणि ते ओस पडलेले राहोत, अशी मनोकामना मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या राज्यस्तरीय मोहिमेला सुरुवात झाली. मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावर मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी उपस्थित होते. आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुंबईत पहिली लस देण्यात आली. तर डॉ मनोज पासांगे यांना दुसरी लस मिळाली. ठाकरे म्हणाले, लस आली असली तरी सर्वात उत्तम लस ही मास्कच आहे. मास्क घालणं आवश्यक आहे. लस आली म्हणजे संकट टळलेलं नाही, मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे.

COMMENTS