“खात्रीनं सांगतो, स्टँपवर लिहून देतो, शिवसेनेचा ‘हा’ मंत्री काँग्रेसमध्ये जाणार आहे”

“खात्रीनं सांगतो, स्टँपवर लिहून देतो, शिवसेनेचा ‘हा’ मंत्री काँग्रेसमध्ये जाणार आहे”

मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर दोन तासांची मॅरॉथॉन बैठक केली असली तरी भाजप शिवसेनेत असलेला वाद संपलेला दिसत नाही. संजय राऊत आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा स्वबळाचा नारा कायम असल्याचे संकेत दिले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अर्जून खोतकर यांच्यात मातोश्री भेटीवरुन चांगलीच जुंपली आहे. आपल्या सांगण्यावरुनच रावसाहेब दानवे यांना मातोश्रीवर प्रवेश नाकारण्यात आला असा दावा अर्जुन खोतकर यांनी केला आहे.

खोतकर यांच्या दाव्याला दानवे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अर्जून खोतकर यांचं मातोश्रीवर एवढं वजन नक्कीच नाही की ते मला बंदी घालू शकतील. उलट त्यांनाच मातोश्रीवर भेटण्यासाठी तीन चार तास वाट बघावी लागते असा दावा दानवे यांनी केला आहे. त्यांच्या गळ्यात शेळ्या मेंढ्यांचं खात लटकावलं यावरुन त्यांचं पक्षातलं वजन कळतं असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे. अर्जुन खोतकर हे पुढील निवडणूक काँग्रेसकडून लढवतील. ते काँग्रेसमध्ये चालले आहेत. हे मी खात्रीने सांगतो हवं तर स्टँप पेपरवर लिहून देतो ते काँग्रेसमध्ये चालले आहेत. काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी त्यांचे बोलणे सुरू आहे. माझ्यावर ते शिवसेना संपवायला निघालो आहे असा आरोप करतात. मात्र तेच आता काँग्रेसमध्ये चालले आहेत असा दावाही दानवे यांनी केला आहे.

COMMENTS