ठाणे महापालिकेवर  भाजपचा झेंडा फडकविणार –  डावखरे

ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविणार – डावखरे

ठाणे – आगामी काळात ठाणे शहरातील संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाईल. त्याचबरोबर 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू, अशी घोषणा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आमदार डावखरे यांनी केली. महापालिका निवडणुकीला अजून सव्वा दोन वर्षांचा अवधी आहे. त्यापूर्वी भाजपाची संघटना कानाकोपऱ्यात पोहचण्यास प्राधान्य दिले जाईल. सध्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार आहे. तर अन्य मतदारसंघात विरोधी पक्षांचे आमदार आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांना भाजपची मोलाची साथ मिळाली होती. आता महापालिका क्षेत्रातील चारही मतदारसंघात भाजपचे संघटनात्मक जाळे मजबूत करण्यात येईल, असे आमदार व नवनिर्वाचित अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सांगितले. भाजपच्या सध्याच्या मित्र पक्षांनाही साथीला घेऊन ठाणे शहरात कार्य करणार असल्याचे डावखरे यांनी नमूद केले.

COMMENTS