राज्यातील युवकांसाठी युवक काँग्रेसचा जाहीरनामा, काय आहे जाहीरनाम्यात?, वाचा सविस्तर!

राज्यातील युवकांसाठी युवक काँग्रेसचा जाहीरनामा, काय आहे जाहीरनाम्यात?, वाचा सविस्तर!

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘वेक अप महाराष्ट्र’ या अभिनव उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. याद्वारे विविध उपक्रम, स्पर्धा, माध्यमांद्वारे संपूर्ण राज्यातील सुमारे ३ कोटी युवकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. हजारो युवकांनी यात बहुमूल्य सूचना दिल्या. या सर्व सूचनांवर चर्चा करून प्रभावी असा युवक जाहीरनामा  ‘महाराष्ट्र ४.०’ बनविला गेला. खास युवकांसाठी बनविलेला देशातील हा पहिलाच जाहीरनामा आहे. युवक जाहीरनामा  ‘महाराष्ट्र ४.०’ मध्ये समाविष्ट केले गेलेले मुद्दे खालीलप्रमाणे-

शिक्षण-

१.    ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत घेतलेली सर्व शैक्षणिक कर्जे माफ करण्यात येतील.
२.    प्रमुख शहरात युवकांसाठी वसतिगृहांची संख्या वाढविली जाईल.
३.    सर्व दिव्यांग युवकांसाठी विनामूल्य उच्च शिक्षण
४.    गुणवान विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.
५.    शेतकरी कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकार बँक हमी देणार

रोजगार-

१. सुशिक्षित बेरोजगारांना रु. ५००० बेरोजगार भत्ता दिला जाईल.
२. महापरीक्षा पोर्टल तत्काळ बंद केले जाईल.
३. १,९१,००० रिक्त सरकारी नोकऱ्यांची भरती पहिल्या १८० दिवसात पूर्ण करणार.
४. स्थानिक युवकांना ( भूमिपुत्र) खाजगी नोकऱ्यांमध्ये 80 % आरक्षण देण्यासाठीचा कायदा करण्यात येईल

सशक्तीकरण-

१. स्वतंत्र युवक कल्याण विकास मंत्रालय स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यात युवा माहिती केंद्र स्थापन केले जाईल.
२. जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विकसित केले जाईल.
३. स्टार्ट-अप साठी ५०० कोटी रुपये आणि कृषी आधारित व्यवसायांसाठी अतिरिक्त २०० कोटी रुपयांचे भाग भांडवल ( seed fund) उभे केले जाईल

आरोग्य आणि जीवनशैली-

१. महाराष्ट्रात अंमली पदार्थांच्या प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी.
२. पदवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सार्वजनिक वाहतूक सेवा.
३. शालेय अभ्यासक्रमात ‘जीवनशैली व्यवस्थापन’ आणि ‘नागरीकशास्त्र’ अनिवार्य केला जाईल.
४. सायबर सुरक्षेचे धडे अनिवार्य केले जातील .
५.महाराष्ट्रातील  ऐतिहासिक वारसा असलेले सर्व गड किल्ल्यांची दुरुस्ती  करून पर्यटनाला चालना देण्यात येईल.

“महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे बनविला गेलेला हा युवक जाहीरनामा ‘महाराष्ट्र ४.०’ विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार केला आहे.  आमचे सरकार आल्यानंतर जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीचा संपूर्ण आराखडा देखील आमच्याकडे तयार असून, जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीमुळे युवकांच्या समस्या मिटणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे” असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले. युवक जाहीरनामा  ‘महाराष्ट्र ४.०’ ची संकल्पना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह युवक काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, रीषिका राका, प्रवक्ता आनंद सिंग, सचिव विश्वजित हाप्पे, सचिव करीना झेविअर, इम्रान खान उपस्थित होते.

COMMENTS