भाषण सुरु असताना भाजप नेत्यानं दिलेली ‘ती’ चिठ्ठी वाचून, खासदार दिलीप गांधींचे डोळे पाणावले !

भाषण सुरु असताना भाजप नेत्यानं दिलेली ‘ती’ चिठ्ठी वाचून, खासदार दिलीप गांधींचे डोळे पाणावले !

अहमदनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज अहमदनगर येथे पार पडली. या सभेदरम्यान भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाले असल्याचे पहावयास मिळाले. झालं असं की पंतप्रधान मोदी हे सभास्थळी येण्यापूर्वी दिलीप गांधी यांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी मोदी हे व्यासपीठावर येण्यापूर्वी दिलीप गांधी यांना भाषण थांबवण्याची चिठ्ठी भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी पाठवली.

ही चिठ्ठी पाहून दिली गांधी यांचे डोळे पाणावले. तसेच मी बोलायचेच नाही का?, आता मला तुम्ही बोलू पण देणार नाहीत का ? अशी विचारणा दिलीप गांधी यांनी बेरड यांच्याकडे केली. तसेच मी जिल्ह्यात चांगली कामे केली आहेत. ते मला मांडायची आहेत असं गांधी यांनी यावेळी म्हटलं. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण थांबवलं.

दरम्यान दिली गांधी यांची उमेदवारी कापूण भाजपनं सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दिलीप गांधी हे नाराज होते. त्यांची नाराजी आज सर्वांसमोर बाहेर पडली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS