दिलीप सोपल यांचं पक्षात स्वागत, पण उमेदवारीला विरोध – भाऊसाहेब आंधळकर VIDEO

दिलीप सोपल यांचं पक्षात स्वागत, पण उमेदवारीला विरोध – भाऊसाहेब आंधळकर VIDEO

सोलापूर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आज राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा सोपल यांनी कार्यकर्त्यांसमोर केली आहे. येत्या 28 ऑगस्टला दुपारी 1 वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बार्शीची राजकीय परिस्थिती पाहता आपण हा निर्णय घेत असल्याचं दिलीप सोपल यांनी म्हटलं आहे. आमदार दिलीप सोपल यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेल्याने दिलीप सोपल यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बार्शी विधानसभा मतदारसंघातून ते आगामी निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान सोपल यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे स्थानिक नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी विरोध दर्शवला आहे. सोपल यांना पक्षहितासाठी शिवसेनेत प्रवेश दिला याचं मी स्वागत करतो. परंतु या मतदारसंघात शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावून शिवसेना वाढली. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी घेण्याचा माझा अधिकार असून उद्धव साहेब तो डावलणार नसल्याचं आंधळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोपल यांच्या प्रवेशानंतर उमेदवारीवरुन बार्शी येथे शिवसेनेत अंतर्गत वाद वाढणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS