राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार मागे घेण्याच्या प्रस्तावाला दिल्ली विधानसभेत मंजुरी !

राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार मागे घेण्याच्या प्रस्तावाला दिल्ली विधानसभेत मंजुरी !

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेत भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्यात यावा असा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. १९८४ मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते असा आरोप करत आपने राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती आहे.

दरम्यान या प्रस्तावामुळे आप सरकारवर काँग्रेसनं जारदार टीका केली आहे. राजीव गांधी यांनी या देशासाठी आपला जीव दिला असून आपने त्यांच्याबाबत जो प्रस्ताव मंजूर केला आहे त्यामुळे आपचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. तसेच आम आदमी पार्टी ही भाजपची बी टीम असल्याचंही काँग्रेसनं म्हटलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि आपमध्ये राजीव गांधी यांच्या पुरस्कारावरुन जुंपली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS