काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना अटक !

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना अटक !

नवी दिल्ली – सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यामुळे काँग्रेसनं आंदोलन केलं आहे. देशभर काँग्रेसनं आंदोलन सुरु केलं असून या आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सहभाग घेतला आहे. दिल्लीत राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गांधींना लोधी रोड पोलीस स्टेशनकडे नेण्यात आलं आहे. तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या काँग्रेसचा हा मोर्चा सीबीआय मुख्यालयाजवळ अडवण्यात आला असून काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असल्याचं दिसत आहे.

त्याचबरोबर चंदीगडमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनी काँगेस कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पाण्याचे फवारे मारले आहेत.

COMMENTS