दिल्लीत आरएसएसचा आगळावेगळा  कार्यक्रम, समर्थकांसह विरोधक, राजकीय पक्षांनाही का लागली आहे उत्सुकता ?

दिल्लीत आरएसएसचा आगळावेगळा  कार्यक्रम, समर्थकांसह विरोधक, राजकीय पक्षांनाही का लागली आहे उत्सुकता ?

नवी  दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे. तीनही दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. भविष्यातील भारत या विषयावर मोहन भागवत व्याख्यान देणार आहे. तिन्ही दिवस फक्त सरसंघचालक मोहन भागवत यांचेच भाषण होणार आहे. संध्याकाळी साडेपाच ते सात यावेळेत हे भाषण होणार आहे. दुसरे कोणतेही वक्ते, पक्ष प्रमुख बोलणार नाहीत.

तिस-या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी प्रश्नोत्तरे होतील. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी उद्या प्रश्न द्यायचे आहेत. या तीन दिवसांच्या कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठीत नागरिक, उद्योग जगत, राजकारणी, धर्मगुरू, काही पत्रकार, विविध देशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदाच संघाकडून अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणज्ये भारतातल्या काँग्रेससोडून जवळपास सर्वच राजकीय पक्षांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामध्ये सपाचे अखिलेश यादव, बसपाच्या मायावती, तृणमुलच्या ममता बॅनर्जी, डीएमके, एआयडीएमके, बीजेडी या पक्षांना यासाठी आमंत्रण देण्यात आलंय. जे कट्टर विरोधी विचारसरणीचे पक्ष आहेत. त्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे या कार्यक्रमाला कोण हजेरी लावणार याची उत्सुकता आहे.

COMMENTS