विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचं नाव निश्चित?

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचं नाव निश्चित?

मुंबई – विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. उपसभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असून या पदासाठी शिवसेना नेत्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर या निवडणुकीची घोषणा करणार आहेत. उपसभापतीपद सध्या रिक्त आहे. त्यामुळे या पदासाठी निवडणूक घेण्यात यावी, यासाठी शिवसेना आणि भाजप युती आग्रही होती. आता अखेर ही निवडणूक होणार असून या पदासाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. कारण भाजपकडून रामराजे यांच्याविरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता आहे.राज्य सरकारकडून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बजेट सादर करण्यात आलं. यावेळी अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातला. यात विधानपरिषदेत रामराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांत दुजाभाव केल्याचा आरोप भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तसंच रामराजेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबतही त्यांनी भाष्य केलं होतं.त्यामुळे भाजपने अविश्वास ठराव मांडल्यास रामराजे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

COMMENTS