लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा करणा-या शिवसेनेला भाजपचा धक्का, ‘या’ पक्षाला दिलं उपाध्यक्षपद ?

लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा करणा-या शिवसेनेला भाजपचा धक्का, ‘या’ पक्षाला दिलं उपाध्यक्षपद ?

नवी दिल्ली – लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा करण-या शिवसेनेला भाजपनं धक्का दिला आहे. लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी भाजपाने वायएसआर काँग्रेस या पक्षाला ऑफर दिल्याची माहिती आहे. भाजपा खासदार आणि प्रवक्ते नरसिम्हा राव यांनी मंगळवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची विजयवाडा येथे भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी हा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. भाजपाच्या या ऑफरला अद्याप जगनमोहन यांच्या पक्षाने कुठलेही उत्तर दिलेले नसल्याची माहिती आहे.

दरम्यान आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २२ जागा वायएसआर काँग्रेसने जिंकल्या आहेत. आंध्र प्रदेशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाचे मतदार वायएसआर काँग्रेसच्या विजयाचा आधार आहेत. त्यामुळे भाजपाच्या या ऑफरला स्विकारण्यापूर्वी जगनमोहन यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करायची आहे. त्यानंतर ते भाजपाचा प्रस्ताव स्विकारायचा की नाकारायचा यावर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

मागील सरकारच्या काळात सन २०१४ मध्ये भाजपाने एनडीएचा भाग नसलेल्या अद्रमुकला लोकसभा उपाध्यक्षपदाची ऑफर दिली होती. त्यानुसार, अद्रमुकच्या थंबीदुराई यांना उपसभापती बनवण्यात आले होते. त्यानंतर अद्रमुक एनडीएत सहभागी झाली होती. त्यावेळी अद्रमुक सर्वाधिक लोकसभा जागा जिंकणारा तीसरा पक्ष होता. त्यानंतर आता भाजपाकडून याच फॉर्म्युल्याचा वापर करुन वायएसआर काँग्रेसला उपाध्यक्षपद देऊन एनडीएत समाविष्ट करुन घेण्याचा विचार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी भाजपची ऑफर स्वीकारणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS