पोलीस उपायुक्तांच्या बदलीला तीन दिवसात स्थगिती, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात …VIDEO

पोलीस उपायुक्तांच्या बदलीला तीन दिवसात स्थगिती, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात …VIDEO

मुंबई – राज्यातील अधिकाय्रांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले असल्याचं दिसत आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या मुंबईतील अंतर्गत बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.अवघ्या तीन दिवसात स्थगिती मिळाल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. परंतु आमच्या सरकारमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना महत्त्व होते. डॉ. रश्मी करंदीकर, शंकर शिंदे, परमजीत सिंग दहिया, संग्रामसिंग निशाणदार, प्रशांत कदम, शहाजी उमप, मोहन दहीकर अशा 12 उपायुक्तांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने गुरुवारी काढले होते, मात्र त्याला अवघ्या तीन दिवसात स्थगिती मिळाली आहे. याचे नेमके कारण अस्पष्ट आहे. यावर विरोधकांनी टीका केली असून ठाकरे सरकारमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली आहे. परंतु आमच्या सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

COMMENTS