ठाकरे-देशमुखांनी उचलली वधूची डोली

ठाकरे-देशमुखांनी उचलली वधूची डोली

नागपूर – नागपूरच्या रेल्वे स्थानकावर २३ वर्षांपूर्वी सापडलेली वर्षा आणि अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह रविवार पाडला आहे. या विवाह सोहळ्यात चक्क राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वधूपिता तर वरपिता म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कर्तव्य पार पडले. दरम्यान, वधू वर्षाच्या डोली ठाकरे-देशमुख यांनी खांद्यावर घेतलेल्या दृष्याने नागपूरकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

अनाथ, अपंग आणि मूकबधित मुलांच्या संगोपनासाठी काम करणारे शंकरबाबा पापळकर अनेकांची पालनपोषण केले. त्यांचा बाप म्हणून त्यांचा विवाह लावून दिला. पण वर्षाचा विवाह सोहळा अनेकांच्या स्मरणात राहणार ठरला. शंकरबाबांनी आतापर्यंत २४ जणांचे शिक्षण करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांचा विवाह लावून दिला. रविवारी वर्षाचा विवाह सोहळा झाला. या विवाह सोहळ्यास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित राहून तिचे कन्यादान केले. तर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी समीरचे वरपिता म्हणून कर्तव्य पार पाडले. अनाथ मुलांच्या विवाहासाठी राजकारण आणि प्रशासनातील दोन दिग्गज व्यक्तींना हजेरी लावून वधू-वरांना दिलेल्या शुभार्शिवादामुळे हा विवाह अनोखा ठऱला.

 

COMMENTS